🇵 🇦 🇳 🇰 🇦 🇯 @pankajbhokare555

● 😉May be "mech.engineer " ⚒🔧🔗 ● 15th DEC. Is my day🎂🍻🍺 ● Mountain 🗻💕 ● Double bar 💪 ● Heathen 💀 ● Nomadic 💚 👣 ● फक्त चढ म्हणा👅

🇵 🇦 🇳 🇰 🇦 🇯 photos and videos

4 weeks ago

समुद्र💙 बऱ्याच दिवसाने पुन्हा लाटांची गजर ..समुद्राचा गाज असे गजर ..गाज शब्द कितीही ऐकले ना तरी त्याचा नाद तिथं किनाऱ्यावर गेल्यावरच कळतो ती आकाशात पसरलेली उस्फुट निळाई . कमी जास्त होणार लाटांचा आवेग .. जो जोश ..आवेग लाटांचा किनाऱ्यावर येताना असतो तोच ती परतताना नसतो हे फक्त त्या दगडावर नुसतं उभं राहून ..बघून जाणवणार नाहीच त्यासाठी मनाची कवाडं उघडून ..किलकिली करून त्या आत कोपऱ्यात गोठून बसलेल्या आपल्या जाणीव ..संवेदना ओसंडून वाहायला हव्यात अश्या रम्य निरभ्र सकाळी किनाऱ्यावर एकटच असताना ..आयुष्यच्या ओढातानीत व्यस्त असणारा तुमच्या माझ्या सारखा प्रत्येक जण एखाद्या महान तत्वज्ञ असल्या सारखं स्वतःशीच वेड्यासारखं बोलायला लागला तर त्यात काही नवल नाहीच पण प्रत्येक वेळी किनाऱ्यावर गेलं की कशाचीतरी उणीव किंवा पोकळी जाणवतेचं त्या समुद्राकडे अस काय आहे,जे माझ्याकडे नाही आहे काय असावं ते? त्याची अथांगता..अभेदता..की तो वादळात काळजाचा थरकाप उडवनरी रौद्रता ?? बघताय ना तुम्ही पण?? नकळतपणे अचानक पुन्हा भानावर येऊन माणूस झालो आणि तुलना करायला लागलो समुद्राची ते ही थेट माझ्याशी!! कुठे तो आणि कुठे मी भावनांचा एक वेगळाच समुद्र माझ्या आत ..मनात असला तरी त्या कागदावर उतरल्या ..व्यक्त झाल्या की संपणारच तो आतला समुद्र कधी ना कधी आटणारच.. अश्या एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे त्या दगडावर उभं राहील की आपोआपच मिळालीयेत .. पण तरीही हा एकच प्रश्न अनुउत्तरीत आहे की तो अथांग अभेद समुद आणि त्याची ती लाट का बर त्यानी धरावी ही किनाऱ्याची वाट?? . . . . #एकतर ्फी #sahyadri_clicker #durg_naad #shivajimaharajhistory #incredibleindia #maharashtra_desha #durg_naad #jayostute_maharashtra #insta_maharashtra #itz_mumbai #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #raigad #india_clicks #shivajimaharaj #rajdhani #trekkerslife #neverstopexploring #sahyadri #mobileclick #mobilephotography #maharashtra_desha

6000
4 weeks ago

धबधबा💙 . . जगण्याचे संदर्भ बदलले की आयुष्य बदलत... तुझ्यासारख सैरभर जगण्याची रितभात नश्वर होते..जेव्हा मी तुझ्यात भिजत असतो..माझे प्रश्न निराळे अर्थात तुझे नक्कीच निराळे असतीलच ..पण तुझ्यात आपसुक निपजलेलं ते स्थैर्य,ती अभेदता माझ्या वाट्याला कधीच आली नाही..मी मनसोक्त जगण्याच्या प्रयत्न करताना जगाच्या त्या प्रवाहा विरुद्ध प्रवास करताना तुझ्या ह्या बेधुंद लहरींची कायम भुरळ पडते . . तुझ्यातल्या त्या अगणित तुषारांशी ..शब्दांशिवाय अव्यक्त संवाद साधाताना...तुझ्यातल माझं मी पण शोधण्याचा प्रवास पुढे चालूच आहे तसाच...ते इतरांसारख काकूळतीच..आजर्व..केविलवानी कधी बोलता आलंच नाही मला..पण माझं अव्यवस्थितपणा असो वा माझा अस्वस्थपणा यांना सांभाळन्याच कसब तू अगदी हिरीरीने सांभाळलस..मी आहे तसा लहानच राहूदे तुझ्यासमोर...मोठं झालं की बोथट होतात जाणिवा आणि उद्धवस्त होतात संवेदना आणि वाढत राहत पाठीवर फक्त त्या जबाबदाऱ्यांच ओझं आज मी पुन्हा त्याच काठावर त्याच दगडावर आलोय ..जिथं तू तुझ्या प्रत्येक तुषारात त्या शुभ्र कमळा सारखी जाणीव अजून जिवंत ठेवली आहेस ..आता आपलं नात एवढं घट्ट झालय की मला काय हवंय हे माझ्या इतकंच तुलाही कळायला लागलंय ..हल्ली त्या सिमेंटच्या स्वार्थी जंगलात श्वास हरवतोय!!अस्पष्ट होतोय !! गुदमरतोय रे !! . . . मी जेव्हा पुन्हा येईन तेव्हा तेवढा माझा हरवलेला श्वास घेऊन येशील?😇. . . #एकतर ्फी #sahyadri_clicker #durg_naad #shivajimaharajhistory #incredibleindia #maharashtra_desha #durg_naad #jayostute_maharashtra #insta_maharashtra #itz_mumbai #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #raigad #india_clicks #shivajimaharaj #rajdhani #trekkerslife #neverstopexploring #sahyadri #mobileclick #mobilephotography #maharashtra_desha

1.4k0
last month

संजीवनी❤️ . हिच्या कुशीत तुझी ऊब शोधणं नाही बरं मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं हीचा हात माझ्या हातात ठेवला जरा धरून तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून सोबत माझ्या हीच असनच तुझं नसन होते खरं सांगू .. हिच्या वळनात ते माझंच फसन होते . तुझी मला आठवण येते हिला आधी कळत माझ्या आधी डोळयातून हिच्या पाणी गळत . जगण्यासाठी आता मला एवढंच सुख पुरे मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरे😌 . . . . #एकतर ्फी #sahyadri_clicker #durg_naad #shivajimaharajhistory #incredibleindia #maharashtra_desha #durg_naad #jayostute_maharashtra #insta_maharashtra #itz_mumbai #maharashtra_forts #huntforspot #historytv18 #raigad #india_clicks #shivajimaharaj #rajdhani #trekkerslife #neverstopexploring #sahyadri #mobileclick #mobilephotography #maharashtra_desha

8160
last month

समुद्र💙 समोर उधाणलेला हा अखंड विस्तृत जलाशय हळूच जेव्हा ह्या इवल्याश्या डोळ्यातून मनात उतरायला लागतो..तेव्हा भावलेलं मन देखील त्याचा त्या गहिऱ्या खोलीतील निर्वात शांतता शोधू पाहत . त्याच्या गर्भातून उलमते कोवळी उस्फुट निळाई ..सूर्यास्ताची लाली अनेकांनी उघड्या डोळयांनी बघितलेल्या ..विणलेल्या स्वप्नाची जाळी, त्यांच्या आणि ह्याच्या मन:संवादाची एक एक ओळ लाट बनून इथं नांदते निस्सिम वैविध्यपूर्ण सजीव जीवन..काही अप्रुश्य अगणित रहस्य या विश्वातील त्याची व्याप्ती मनभर थैमान घालु लागते आवडती नाआवडती अनेक आठवणी तराळून जातात काही सुख-दुःखद अनुभव सुद्धा काहूर माजवतात . त्याच्यात विलीन होत्यासाठी समोर उसळलेल्या लाटा पहिल्या की ,ओठांवर अलगत अलवार वेडे हसू उमटून जाते सागराच्या त्या गाजेची अलौकिक धून मात्र उतरत जाते श्वासातुन रक्तात भिनत जाते हृदयाच्या धडधडीत ती एकरूप होते मनाच्या या निशब्द अवस्थेचा फायदा घेऊन ती वाहत जाते रक्तातुन सर्वांगामध्ये एक जाणिवेची लय साधून काबीज करून टाकते चित्त अश्या मंत्रमुग्ध अवस्थेत ..या समाधीत तल्लीन होत असताना, अस्तित्व?..ते तर कधीच विसरून गेलेले असते अस वाटत की पसरावेत बाहू आणि द्यावे झोकून त्या दगडावरून स्वतःला...त्याच्या त्या निर्वात पोकळीत हे जग बदलून त्या समोरच्या जगातला प्रवेश फक्त हे शरीराचा त्याग करून होत असेलही पण मन?..त्याचा वेडेपणा.. त्याचा कधी अंत होत असेल?😇 . .

6980
May 2019

जमलंय का😬😜 . . . . . . #handstand #calesthenics

4990
May 2019

मायानगरी💙 . . . . #एकतर ्फी

5980
May 2019

एकतर्फी❤️

1.2k0
May 2019

पायरी ती उंबरठ्यात अडकलेली..बहरलेली.. म्हणाल तर त्या दगडी साच्यात एकरूप झालेली संगमरवरी वा अशी दगडी निमूटपणे निश्चल राहणारी सतत झुकते माप घेणारी मर्यादेच्या बंधनातील तर कधी तरी स्वतःच्या अस्तित्वाची जाण करून देणारी कधी कडक ऊन .तर कधी हिरवळ पांघरूण ऋतूत बहरणारी हक्काची मायेची ..सुख दुःखाच्या सोबतीची हळव्या आठवनीशी उंबरठ्यातच झिजणारी . पायरी ती उतरता-उतरता हळूच ठेच लागते आणि आठवणींच्या गाभाऱ्याला पुन्हा उमाळा येतो त्या मागच्या उंबरठ्यापलिकच्या तटबंदी.. विरगळ ..त्या कोरीव दरवाज्यात फिरून पुन्हा एका क्षणी एकटवतात जेव्हा मन भानावर येते तेव्हा आपण त्या पायऱ्या उतरून खाली आलेला असतो.. आता त्या दाराच्या पलीकडच्या जगातलं मन ह्या अलीकडच्या जगात स्थिरावत एक एक पायरी उतरताना उतरणीच नैराश्य नसतंच कारण दारा अलीकडच्या मनाला कळतच नाही की पलीकडच्या जंगलात कस समावत जाते पण ह्या सिमेंटच्या जंगलातही कधीतरी पुन्हा एक बिंदू चमकतो पुन्हा आठवणींना मोहोर येतो आणि त्याच पायरी वर मन धावू पाहत . पायरी ती एक एक चढून स्वतःचा तोल सांभाळून स्वतःची पायरी स्वतःच ओळखून जेव्हा त्या शेवटच्या सर्वोच्च पायरीवर असतो तेव्हा मागे वळून फिरून बघितले की कळत चढून आलेली पायरी ती जाणीवांची असते ..ती आपुलकीची असते ..ती जबाबदारीची असते ..ती जिद्दीची असते आणि ती प्रेमाची सुध्दा असते❤️ . . . #एकतर ्फी

8050
May 2019

फक्त चढ म्हणा💪 . ओळखलत का रे मला? भर उन्हात आला कोणी, कपडे आहेत मळलेले, डोक्यावरती टोपी क्षणभर बसलो नंतर हसलो ,बोललो वरती पाहून, 'आलो आहे परत फिरून ,आता घे पुन्हा आपलंसं करून’. . अगदी आनंदात तुझ्यावर हिंडलो..नाचलो निरोप तुला देताना ,मी मात्र तुझ्यातच हरवलो. . . कधी पडलो, कधी खरंचटले, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून डोळ्यात ...सहयाद्री तुझे रूप फक्त राहीले . मित्रांना घेउन संगे आता तुझ्या डोंगर दऱ्या फिरतो आहे कधी सांधनात कधी कड्यावर ..स्वतःच स्वतःला शोधत आहे वर त्या खुंटीकडे लक्ष जाताच हसत हसत उठला ‘आधार नको रे मला’, जरा एकटेपणा वाटला. . मोडून पडला आत्मविश्वास ..तरी मोडला नाही कणा, पाठीवरती बॅग घेउन, आता "फक्‍त चढ म्हणा"!!❤️ . . टीप-चढताना लै सोप्पय पण उतरताना लै फाटली राव😌😵😝

1.1k0
April 2019

वाट ती कोणतीही एखादी पाऊलावाट असो ,डांबरी असो वा अशी एखादी खुंटीची असो ती सोडते तुम्हाला तुमच्या दरवाज्या पर्यत ..ध्येयापर्यत आणि थांबते बाहेर एकटी होऊन वाट ती घेते गोंदवून सर्वांगभर लिपी पादुकांची ..गाडीच्या चाकांची..गाई म्हशींच्या खुरकांची पण अनवाणी पावलांचे ठसे तर ठेवते जपून एखाद्या दागिन्या सारखी वाट ती सरकतच असते पावलांखालुन अगदी निशब्द निमूटपणे पण तिलाही येते लहर कधीतरी नागमोडी वळणावळणाची..थेट माणसाच्या चालीची . वाट ती वाट दाखवत सगळयांना आपल्या सोबत वाहून नेते.. पाऊल वाटेपासून ते अगदी चार पदरी महामार्गापर्यत फुगत जाते ..ह्यात तिला काहीच गर्व वा स्वार्थ नसतो फक्त ती आपली सोय असते . वाट ती घालते पायघड्या आपल्या पाऊलंखाली तीच काळीज अंथरून ..तिच्यावर थोडं चला ..पाऊलांचे कान करा अन ऐका तुम्हलाही ऐकू येऊल तिची धडधड . वाट ती आपल्या आयुष्याच्या रांगोळीची एक रेष असते जी जोडते आणि सोडते अगदी शेवटच्या ठिपक्या पर्यत..आणि पुन्हा ती पुन्हा थांबते एका अर्तक्य महादरवाजा बाहेर पुन्हा एकटीच😊 . . . #एकतर ्फी #मन ातलं

4680
last month

नजर हटी दुर्घटना घटी😵 . #एकतर ्फी

4330
April 2019

अंधार🖤 काळा अंधार व्यापून रहावा सगळीकडे असं वातावरण. प्रकाशाला घुसमट व्हावी आत शिरताना असे काळोखे कोपरे. जिथे मनाला जखम झाली ना तरी जखमेतून बाहेर पडतो आरक्त अंधारच हळू हळू नशा चढत जाते अंधाराची. उजेड धडका देत राहतो त्या कमानीवर ,एखाद्या चुकार फटीतून आलाच उजेड आत अंधाराशी लढाई जिंकून तरी मी सज्ज असतोच गडद काळं ठिगळ घेऊन काळा अंधार धमन्यांमधे वाहतो. श्वास उच्छवास अंधाराचेच होतात आणि मग आतला सैतान हसत राहतो माझ्या धडपडीवर. स्वतःचंच अस्तित्व जाणवत नाही. स्वतःलाच वाटतं की आता मी नाहीच! मी कुठाय, उरलाय तो फक्त काळा रंग ..आत आणि बाहेरही या अंधाराचं एक बरं असतं, सावल्या पण दिसत नाहीत. म्हणजे कुणी आहे की नाही हेच कळत नाही मग स्वत:लाच बरं वाटतं उगाच की माझ्यापर्यंत कोणीच पोचू शकणार नाही. ह्या नादात लक्षातही येत नाही मीही कुणापर्यंत पोचू शकणार नाही. . . त्या अंधारात मी चाचपडत बसतो. ह्या जीवघेण्या अंधारात कधीतरी उगाच भरकटतांना त्या समोरून येणाऱ्या पांढरा प्रकाश मस्त निळ्या रंगाच्या आभाळाची आठवण करून देतो, एक क्षणभर घुसमट थांबली असं वाटतं , पण दुसर्‍याच क्षणी मनातली निळाई भोवतालच्या कृष्णविवरात वितळत जाताना दिसते आणि एकदम पुन्हा तो अंधार मला वेढून टाकतो. . . कधीतरी वाटतं, की काय अर्थ आहे अश्या असण्याला? काय आहे ह्या काळ्या रंगात ?पण हे वाटणं क्षणिकच. पुन्हा तोच काळा अंधार आणि पांढऱ्या उजेडाच्या सूक्ष्म रेषेवर बसून अंधारडोहातलं खोलपण किंवा उजेडाच उथळपण बघत राहायचं बस्स🖤 . . . #मन ातलं #एकतर ्फी

4290
April 2019

दुर्ग-भंडार💛

3600
March 2019

ब्रह्मगिरी💛 . ठाण्याहुन रात्री 11.03ची कुशीनगर एक्सप्रेस...आपला रोजचाच जनरल डब्बा ..साधा एक पाय ठेवायला पण जागा नाही .. तरीही तसच एक पायावर उभं राहून सकळी 3.00लाच नाशिक गाठल..त्रंबकेश्वर ला जाणारी पहिली बस सकळी 5.00 ला होती त्यामुळे नाशिक रोड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच मस्त पाय पसरून मच्छर मारत झोपण्याचा व्यर्थ प्रयत्न केला..उठून हेडलाईट नसलेल्या ST मधून त्रंबक 5.45 पोचलो..अजूनही अंधारच होता..दुर्गभंडार कडे जाणारी थोडीफार माहीत विचारून पायऱ्या चढायला सुरवात केली..एव्हाना सूर्याने पुर्वेला आपले केशरी गुलाबी रंग उधळायला सुरुवात केलीच होती😍 . नशिबाने किल्ला पायऱ्यांचा होता म्हणून रस्ता न चुकता आम्ही अर्ध्या तासातच वर ब्रम्हगिरी वर पोचलो तिथून दुर्गभंडार ला जायचं होते ..चांगला सरळ रस्ता दिसत असतात आम्ही जरा कडा उतरून जायचं ठरवलं ..जराशी फाटली पण मजा आली😉..उतरून थोडं पुढं गेल्यावर एक 5-6 फुटाचा हातच्या मनगटाएवढा पिवळाजर्द साप माझ्या अगदी पायासमोरून सळसळ करत उंच गवतात शिरला😵..एवढा मोठा साप बघितल्यावर माझी काय पुढं जायची हिम्मत होईना..तरी तसच जीव मुठीत घेऊनच आख्खा किल्ला फिरत होतो..आता जरा कुठं गवत नुसतं हवेने वाजलं तरी आता घाम फुटत होता😬 . डोंगर पोखरून कोरलेल्या मोहून टाकणाऱ्या पायऱ्या..साप दिसताच उडालेली घाबरगुंडी ..माकडाना पाणी पाजताना त्याचे तृप्त झालेले डोळे..सूर्याने मनमोकळेपणाने उधळलेले रंग ..अस सगळं सोबत घेऊन परत नाशिकला रंगपंचमीदिवशी पेशवेकाळीन परंपरा असलेल्या रहाडात उड्या हाणायला निघालो😋

4430
March 2019

आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्या आधी हातावर उभं राहायला शिका🤸 . . #handstand #calisthenics

4760
March 2019

चंदेरी💙

4160
March 2019

वजीर💚 . . . #handstand #calisthenics

4630
March 2019

वजीर💛 बुध्दीबळाच्या पटावर प्यादी नाममात्र असतात आपल्या "चालीने" आणि "बुद्धीच्या" जोरावर उभा डाव फिरवतो ..तो वजीर!! . लाख आली असतीलही वादळे..खेटली असतील तुफाने...रोखल्याही असतील त्याच्या वाटा..त्याला पडण्याचे अनेकांनी कैक केले असतील कावे पण त्या अडखळ्यांना न अडखळून अजूनही आपल्या जागेवर "ठाम" आहे ..तो वजीर!!. . एवढाही एकटा नाहीच आहे तो जेवढा आपण त्याला समजतोय..इथं गर्दीत राहुनही आपलं स्वतःच वेगळं अस्तित्व अजुनही नाही ..त्याने तिथंच जरा सगळ्यांनपासून वेगळं राहून अस्तित्वा सोबत स्वतःचा "आत्मसन्मान" जपणारा ..तो वजीर!! . . पावसाळ्यात येतच असतील काळे ढग ..जाता जाता त्याला मारतच असतील मिठी..काळ्या ढगातून पडणारा पाऊस पण त्याच्या पायाशी लोळण घेऊनच पुढे जात असेल.. एवढं जरी असलं तरी त्याचा उंचीतला "मोठेपणा" स्वभावात दाखवणारा ..तो वजीर!! . माझ्या सारखी अनेक आले असतील..तोही बघून मनात म्हटला असेल 'किती रे तुम्ही छोटे'!..पण जेव्हा त्याच्याच अंगावर पाय देऊन वर चढतो ..अगदी शेवटी आपण त्याच्याहीपेक्षा उंच होवू पाहतो..अगदी तेव्हाही स्वतःची छाती गर्वाने फुलावणारा ..तो वजीर!! . एक तो वजीर बुद्धीवान..नम्र..धीट..निस्वार्थी!!. अन त्याचे सगळे गुण माझ्यात उतरवू पाहणारा ..मीही एक "वजीरचं"!!❤️

4530
March 2019

महादरवाजा💛

4190
February 2019

इतर सुळक्यांन सारख स्वतःची उंची वाढवण्याच्या शर्यतीत भाग घेण्यापेक्षा ..त्या वजीरा सारखं स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करावं😍

4690
February 2019

कुर्डुगड💙

4120
February 2019

आकाशापलीकडचे आकाश💙 आहे एक आकाश माझं ही.. ना कोणाची उसनी त्रठस्त निरीक्षणे.. ना खोटी आश्वासने घेऊन बनवलेले..संकटांच्या सांदीफटीतून दिसणारं ..जरी विशिष्ठ ओळख नसली ..तरी ते माझं आकाश आहे आहे एक आकाश माझं ही.. कोणी दुसरं येऊन त्यात उड्डाण भरण्या आगोदर स्वतःच्या पायावर उभं राहून .. मनगटाच्या जोरदार उडी मारून वर हाताला लागेल तेवढं छोटस का असेना तरी ते माझं आकाश आहे आहे एक आकाश माझं ही.. त्यात नकळत होणारे उल्कापात..ग्रहणे..मध्येच येणारे अपेक्षांचे काळे ढग..त्याच काळ्या ढगांना जबाबदारीची थंड हवा लागल्यावर हलकेच पडणार सुखाचा पाऊस ..मध्येच कडाडून चमकून जाणारी धोक्याची वीज..अस सगळं जरी असलं तरी ते माझं आकाश आहे आहे एक आकाश माझं ही कोणीतरी येऊन माझा सूर्यास्त रंगावण्या पेक्षा..स्वाभिमानाचे चार - दोन पक्षी उडूवून..आपल्या इच्छा आकांक्षाचे पिंजून ठेवलेले ढग हवेत सोडून ..कर्तव्याचे लाल-गुलाबी रंग उधळून होणारा अस्त अगदी नेत्रसुखद का नसेना तरी तो माझा सूर्यास्त आहे आणि ते आकशही माझंच आहे आहे एक आकाश माझं ही सूर्याचाही अस्त होईलंच कधीतरी ..माझं आकाशही रंग बदलून निळ्याच काळभोर होईल..दाहक सुर्याची जागा ती शितल चंद्रकोर घेईल..रात्रीच्या त्या तंद्रीच्या धूसर शांत वाऱ्याला अन माझ्या तुटलेल्या स्वप्नाच्या त्या ताऱ्यांना कवेत घेणारं आकाशही माझंच आहे💙 . . . . टीप-उरले सुरलेले triceps पण घ्या बघून😉

4790
February 2019

बरं मी काय म्हणतो.. टाकून बघावी का उडी😍

4700
January 2019

तटबंदी💚

3940
January 2019

आयुष्यात येणारी संकटं ह्या दगडापेक्षा नक्कीच छोटी असतात😌

3640
January 2019

अशेरीगड💚

3730
January 2019

रस्ता . . तो कधीच कुठेच नेत नाही तो तर निश्चल..निर्जीव आपणच चालू लागतो त्यावर हवी ती दिशा ठरवून .... त्या वरची ती वळणही कुठेच जात नाहीत ती सुद्धा तशीच पडून असतात कोपऱ्यावर..आपणच ठरवायचं असत वळायचं की त्या पडीक वळणावर की तसच पुढं चालत राहायचं.... . . आयुष्यच्या रस्त्यावर सुद्धा संकटे आल्यावर थोडं त्यासारख बाहू विस्तारून .. वळणार त्याच्यासारख थोडं झुकून.. मध्येच आलेल्या अहंकाराच्या खड्यांत नम्रतेची माती टाकून ते बुजवून..कधी तेच चुकवून पुढे जात राहायचं.. त्यावर चालताना तो कधीच संपत नाहीच संपेल असं वाटतं आणि सुरू होतो दुसरा रस्ता तिथून, तो कुठे घेऊन जात आहेत याची पर्वा नसते, कारण अद्याप ठरलेलंच नसतं कुठे जायचंय कदाचित कुठे जायचंच नसतं😌 रस्त्यांमागून रस्ते,विचारांमागून विचार तुडवायचे असतात. कधीतरी फक्त चालत राहायचं असतं कुठेही न पोहोचण्यासाठी फक्त बोलत राहायचं असतं कोणालाही न ऐकवण्यासाठी माणसाचे पाय शेवटी ते कधीतरी चालून दमणारच.. रस्तेच ते शेवटी कुठेतरी जाऊन संपणारच. आयुष्यातच्या त्या शेवटच्या टोकावरून मागे वळून स्वतःच्या विचारांचे विखुरलेले तुकडे गोळा करून आणि पुन्हा चालायला लागायचं त्याच रस्त्यावर ...बस्स. . . #एकतर ्फी

4000
January 2019

पाणी हेच जीवन💚 . . . मराठावाड्यात दरवर्षी एप्रिल मे महिण्यात लागणारे पिण्याच्या पाण्याचे टँकर ह्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच चालू झाले आहेत.. पाणी वाया घालवताना निदान एवढा विचार जरूर करा🙏

5300
December 2018

स्वछंदी💚

4310
December 2018

जमलंय का..?😝 . . . #handstand #calisthenics

4170
December 2018

असाही एक सूर्यास्त व्हावा... . असाही एक सूर्यास्त व्हावा..की समोरच्या क्षितिजावर चाललेल्या त्या बेधुंद रंगाच्या उधळणीत स्वतःला उधळून देता यावं. . . असाही एक सूर्यास्त व्हावा ..की त्याला विचाराता यावं कुठुन येतो एवढ तेज की तुझ्या उसन्या प्रकाशात सुद्धा इथले चाँद-सितारे पण भाव खाऊन जातात. असा ही एक सूर्यास्त व्हावा की ..त्याला म्हणाव बघ!..बघ हा स्वार्थी पणा ..जो-जो सकळी तुला दोन्ही हात जोडून वंदन करतो तो-तो तू जाताना मात्र तुझ्याकडे पाठ फिरवतो ..तुही एक बरंच करतोस रोज जाताना तुझा कारभार चंद्राच्या हाती देऊन जातोस. असा ही एक सूर्यास्त व्हावा ..की त्यालाही सांगता यावं तुझ्या उजेडात तुला दिसतात ते फक्त फसवे चेहरे ..बनावट आणि मुखवटेधारी..खरे चेहरे आणि त्यावरील मुक्या भावना तर त्या काळोखाने पहिल्या..तुझ्या उजेडात फक्त साधेपणाचा..खरेपणाचा आव आणला जातोय अरे भास्करा !!..तुला 'सुद्धा'फसवलं जातंय. असा ही एक सूर्यास्त व्हावा की...अगदी त्याच्या सारख जाता जाता का होईना आयुष्यभर जपलेल्या स्वाभिमानाची ..कमावलेल्या आठवणींची चार किरणे मुक्तहस्त पणे त्या क्षितिजावर उधळून आपलही आकाश गुलाबी लाल केशरी रंगानी रंगवता यावं . असा ही एक सुर्यात व्हावा ..की शेवटी आपलाही सूर्य व्हावा ..त्याच्यासारख आपल्या अस्तातही पहाटेच्या पूर्वेच्या किरणासारखं आरक्त होऊन उदय होण्याची जिद्द यावी 💪 . . #एकतर ्फी

4890
Load More ↓